खोक्याचा मुक्काम जेलमध्येच
सतीश भोसले उर्फ खोक्यावर इतर 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच एनडीपीएस या गुन्ह्यामध्ये अध्याप्याला ताब्यातही घेतलं नाही. बॅटने मारहाण प्रकरण, आणि ढाकणे कुटुंबावर जीवघेणा हल्ला. या प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही त्यामुळे खोक्याचा मुक्काम हा जेलमध्येच राहणार आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा
शिरूर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. अँडव्होकेट राजन धसे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, खोक्याची सुटका इतक्या होणार नाही. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता.
advertisement
कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या?
सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली. सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
खोक्याने अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. मात्र, खोक्याला आता स्टंटबाजीमुळे जेलची हवा खावी लागत आहे.
