हात जोडून माफी माग...
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पांगरी गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एका तरुणाने केलेल्या पोस्टसंदर्भात त्याला धमकावले जात असल्याचे दिसत आहे. "अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही माझी चूक झाली.. हात जोडून माफी माग.." असा संवाद या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. माफी मागणारा तरुण स्पष्टपणे घाबरलेला दिसत आहे.
advertisement
वाल्मीक कराड गँगची एक्टिव?
देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या कारागृहात आहे. मात्र, ही घटना त्याच्या गँगची बाहेर सक्रियता दर्शवते का, असा सवाल या व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे. कारागृहात असूनही त्याच्या नावाने अशा प्रकारे लोकांना धमकावले जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलीस तपासाची प्रतीक्षा
दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळू शकली नाही. तसेच, हा व्हिडिओ कधीचा आहे, याबद्दलही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, समाज माध्यमांवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.