आई आणि बायको शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेली अन्...
कृष्णा नंदकिशोर लड्डा (वय 27) असं या मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितलं जात आहे. शुक्रवारी, 12 तारखेला, आठवडी बाजार असल्यामुळे त्याचे वडील खताच्या दुकानात कामासाठी गेले होते, तर आई आणि पत्नी माजलगाव येथे आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. घरी कुणी नसताना, कृष्णाने घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
बापाच्या पायाखालची जमीनच सरकली
दुपारी सुमारे 12.30 वाजता त्याचे वडील जेवण करण्यासाठी घरी परतले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर उघड झाला. लेकाला लटकेला पाहून बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. लड्डा कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. कृष्णा हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याला दोन बहिणी आहेत. आई, वडील आणि पत्नी असा त्यांचा छोटा परिवार होता. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
