आईने पदर ओला केला
मला वेडिला काय कळणार, आता कोर्टाच्या फेऱ्या सुरु आहेत. न्याय कधी मिळेल याची प्रतिक्षा आहे. आता देवाला कोणतं साकडं घालावं म्हणजे न्याय मिळेल, असं म्हणताना संतोष देशमुख यांच्या आईने पदर ओला केला. माझं लेकरू त्या दिवशी मला बोलून गेलं. त्याची काही चूक नव्हती, अशी प्रतिक्रिया शारदाबाई यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना दिली.
advertisement
किती वेदना झाल्या असतील
थोडी फार मारहाण झाली असती तरी चाललं असतं पण असं क्रूरतेने संपवायला नको होतं. त्याला किती वेदना झाल्या असतील. त्याने कसं सहन केलं असेल, असंही संतोष देशमुख यांच्या आईंनी म्हटलं आहे. मी आधी मुलगी वैष्णवी, मुलगा विराजयांना घेऊन लातूरला रहात होते. हत्येनंतर सर्वच गावी आलो, असं संतोष देशमुख यांच्या पत्नीने सांगितलं.
रोज कुणीतरी घराचा पत्ता विचारत येतो
रोज कुणी ना कुणी येतंच... कधी एखादा नेता, अधिकारी येतो तर कधी कुणी समाजिक कार्यकर्ता. गावात कुणी बाहेरगावाहून आलं तरी तो घराचा पत्ता विचारत येतो. आम्हाला भेटतो, बालतो अन् जातो पण आम्हाला न्याय काही मिळत नाही, असं म्हणत त्यांनी रोष व्यक्त केला.
न्याय कधी मिळणार?
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वर्षपूर्ती झाली आहे. हे प्रकरण सध्या विशेष मकोका न्यायालयात असून 20 सुनावण्या पार पडल्या आहेत. तर 7 आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज केले होते, ते आता फेटाळून लावले आहेत. अशातच या प्रकरणात आता 12 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
