TRENDING:

बीडमध्ये अत्यंत क्रूर अन् अमानुष प्रकार, वडिलानंतर आता 4 वर्षांची चिमुकली आढळली गळफास दिलेल्या अवस्थेत

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्यात एका अत्यंत क्रूर आणि अमानुष घटना समोर आली आहे. बीडच्या इमापूर येथे एका चार वर्षांच्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यात एका अत्यंत क्रूर आणि अमानुष घटना समोर आली आहे. बीडच्या इमापूर येथे एका चार वर्षांच्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे मयत मुलीच्या वडिलांनी काल (बुधवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वडिलांच्या आत्महत्येनंतर एका चार वर्षीय चिमुकलीचा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीड तालुक्यातील इमापूर आणि भाटसांगवी गावांच्या परिसरात घडली. काल, भाटसांगवी येथील रहिवासी जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, त्यांच्यासोबत असलेली त्यांची चार वर्षांची मुलगी बेपत्ता होती. ती कुठे आहे? तिच्यासोबत काय घडलं? याची काहीच कल्पना घरच्यांना नव्हती. तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. या घटनेमुळे आधीच बोराडे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

advertisement

यानंतर आज सकाळी, बीड शहरातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही तरुणांना एका लिंबाच्या झाडाला एका चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. ही माहिती मिळताच, परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासादरम्यान, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या जयराम बोराडे यांच्या चार वर्षांच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले.

advertisement

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर लगेचच चिमुकलीचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वडिलांनी मुलीची हत्या करून आत्महत्या केली की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुहेरी मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये अत्यंत क्रूर अन् अमानुष प्रकार, वडिलानंतर आता 4 वर्षांची चिमुकली आढळली गळफास दिलेल्या अवस्थेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल