खेळता- खेळता चिमुकला विहिरीत पडला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राहेरी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शेतामध्ये विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे काम अपूर्ण आहे. या विहिरीच्या बाजूला फलके यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे फलके कुटुंबीय आपल्या शेतामध्ये सरकी खुरपण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा लहान चिमुकला कन्हैया देखील त्यांच्यासोबत होता. आजोबा झाडाखाली आराम करत होते, तर त्याची आजी आणि आई शेतामध्ये सरकी खूरपत होत्या. कन्हैया आपल्या आजोबा शेजारी झाडाखाली चेंडू खेळत होता.
advertisement
ठेकेदारावर कारवाईची मागणी
खेळता-खेळता चेंडू विहिरीत पडला. विहिरीत पडलेला चेंडू पहाण्याचा प्रयत्न चिमुकला करत होता. मात्र तोल जाऊन तो पाण्यात पडला. विहीरीत मोठ्याप्रमाणात पाणी असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान जर विहिरीला संरक्षण जाळी असती तर कन्हैयाचा जीव वाचला असता. ठेकदाराच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.
