गणेश मंडळाचे देखावे
सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध प्रकारचे देखावे याच गणेशोत्सवांच्या दहा दिवसात साकारत असतं. बीड जिल्ह्यात देखील एक असे गणेश मंडळ आहे की ते मागील एक-दोन नव्हे तर तब्बल 35 वर्षांपासून दरवर्षी नवनवीन देखावे सादर करते. गणपतीच्या उत्सव काळामध्ये विविध विषयांना किंवा चालू वर्षातील घडामोडींवर देखावा सादर केला जातो. हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गणेश भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात.
advertisement
गणपती बाप्पाला 21 दुर्वाच का वाहतात? जाणून घ्या कारण
झेंडा चौक गणेश मंडळाचा उपक्रम
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात झेंडा चौक परिसरात 1978 रोजी आनंद गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस पासून ते आत्तापर्यंत त्यांनी विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. यंदा चांद्रयान 3 चे भारताने यशस्वी उड्डाण केल्याबद्दल गणेश मंडळाने चांद्रयानचा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे हा देखावा घरगुती वस्तूंपासून तयार केला आहे.
गणपती मंडळाच्या सर्व सदस्यांनी हा देखावा तयार करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपूर्वी तयारीला सुरुवात केली. हा देखावा बनवण्यासाठी कापूस वापरलेले खपट यासह घरगुती पद्धतीने तयार केलेले विविध प्रकारचे कलर यांचा वापर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी विविध आकर्षक अशी रंगाची लाइटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तांना हा देखावा अधिकच आकर्षित करत आहे.