बीड : बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी कारमधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी नेण्याऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या कारवाईत दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे सापळा रचण्यात आला. त्यानंतर दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.
advertisement
पोलिसांना जप्त केलेली उलटी व्हेल माशाचीच असल्याचा संशय आहे. व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो आणि त्याच्या कोणत्याही अवयवाचा किंवा उत्पादनाचा व्यापारी वापर करणे गुन्हा आहे. व्हेल मासा शारीरिक प्रक्रियेतून जी उलटी करतो, ती द्रव स्वरूपात असते. या उलटीला 'अंबर ग्रीस' असे म्हटले जाते. पकडलेल्या दोन आरोपींसमवेत अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक
या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे (वय 38, रा. पिंपरी, ता. हवेली, पुणे) आणि विकास भीमराव मुळे (30, रा. शिखरवाडी, पो. पारनेर, ता. पाटोदा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे, ज्याची अंदाजित किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या उलटीची वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. औषधनिर्मिती, तसेच अत्तरनिर्मितीमध्ये एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो.
बीडमध्ये पहिल्यांदाच मोठी कारवाई
बीड जिल्ह्यात यापूर्वी अशा प्रकारची व्हेल तस्करीची कारवाई बीड पोलिसांनी कधीही केली नव्हती. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांना व्हेल माशाच्या तस्करीत मोठी कारवाई करण्याची संधी मिळाली असून, यासाठी पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, किशोर पवार, उपनिरीक्षक माधव काटकर, सागर सोन्ने, बलराज सुतार, रवी आघाव, ज्ञानेश्वर मराडे, बाळू रहाडे, दिलीप राठोड, धनंजय येवले, विलास कांदे, अनिल आसेराव, अशोक राडकर, अनिल घटमळ आदींनी ही कारवाई यशस्वी केली
