TRENDING:

बीडमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार, 8 दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्याच्या परळी शहरात पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या बरकत नगर परिसरात एका १२ वर्षीय बालिकेवर दोन नराधमांनी अत्याचार केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्याच्या परळी शहरात पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या बरकत नगर परिसरात एका १२ वर्षीय बालिकेवर दोन नराधमांनी अत्याचार केले आहेत. तर इतर दोघांनी त्यांना मदत केली. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच परळीतील रेल्वे स्थानक परिसरात एका बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली असताना, पुन्हा असाच प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
AI generated Photo
AI generated Photo
advertisement

नेमकं काय घडलं?

परळी शहरातील बरकत नगर येथे ही घटना घडली. दोन मुख्य आरोपींनी अल्पवयीन मुलीला एकटं पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या गंभीर गुन्ह्यामध्ये आणखी दोघांनी त्यांना मदत केल्याचा आरोपही पीडितेच्या तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर परळीती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेत चार आरोपींविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

आठ दिवसांत दुसरी घटना

विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच परळी रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे एका बालिकेवर अत्याचार झाला होता. एका नराधमाने परळी रेल्वेस्थानक परिसरात आईच्या शेजारी खेळणाऱ्या मुलीला उचलून घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती.

या घटनेनंतर परळीत संतापाची लाट उमटली होती. या प्रकरणी एक दिवसासाठी परळी बंदची घोषणा देखील करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता बरकतनगरमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर दोघांनी अमानुषतेचा कळस गाठला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नराधम आरोपींचा शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार, 8 दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल