TRENDING:

रक्ताचं नातं विसरला, नराधमाने आईच्या डोक्यात घातला दगड, बीडमध्ये माऊलीचा करुण अंत!

Last Updated:

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने अमानुषतेचा सर्व सीमा पार करत आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Son Killed Mother: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने अमानुषतेचा सर्व सीमा पार करत आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. त्याने आईच्या डोक्यात दगड घालून जीव घेतला आहे. हत्येची ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

advertisement

चंद्रकांत कांगणे असं अटक केलेल्या २६ वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे. तर सुनंदा ज्ञानोबा कांगणे असं मृत पावलेल्या ५० वर्षीय माऊलीचं नाव आहे. घर नावावर करुन देण्याच्या वादातून मुलाने आईची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईकडे घर नावावर करून देण्याची मागणी करत होता. मात्र, आई सुनंदा यांनी घर स्वतःच्या नावावरच ठेवले होते. ज्यामुळे मायलेकांमध्ये सतत वाद होत होता. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

advertisement

हा वाद विकोपाला गेला असता, रागाच्या भरात चंद्रकांतने आईच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात सुनंदा यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच करूण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.

advertisement

पोलिसांनी तातडीने आरोपी चंद्रकांतचा शोध घेऊन त्याला अटक केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी चंद्रकांत कांगणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्या आईचा खून केल्याच्या या घटनेने संपूर्ण परळी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
रक्ताचं नातं विसरला, नराधमाने आईच्या डोक्यात घातला दगड, बीडमध्ये माऊलीचा करुण अंत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल