या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, हे अपहरण प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीच्या गर्लफ्रेंडनेच सुपारी देऊन हे कांड केलं आहे. या प्रकरणात ७ जणांना शनिवारी न्यायालयाने जामीन दिला.
नेमकं प्रकरण काय?
दिया नन्नवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०११ मध्ये दिया यांचे पहिले लग्न संतोष कंठीलाल पवार याच्यासोबत झाले होते. मात्र त्याला दारुचे व्यसन होते. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या कारणातून काही काळाने दिया आणि नागनाथ नन्नवरे यांचे प्रेमसंबंध जुळले. यातून दोघे ११ वर्षांपूर्वी पळून बीड येथे आले. तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत. नागनाथ याचे पूर्वी ज्योती काळे (रा. जामखेड) हिच्याशी प्रेमसंबंध होते. ती सतत नागनाथला ब्लॅकमेल करत होती. ज्योती काळेने पुण्याच्या गुंडांच्या टोळीला सुपारी देऊन हे अपहरण घडवून आणले.
advertisement
अंबी येथून तरुणाची १४ तासांनी सुटका
भरदिवसा मारहाण करुन नागनाथ यांचं जीपमधून अपहरण झाले होते. मारहाण करत अपहरण करतानाचा व्हिडिओही समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पीआय मास्ती खेडकर, एपीआय बी. बी. दराडे, पारसनाय संजय कुकलारे यांच्यासह पीएसआय श्रीराम खटावकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. शनिवारी अंबी येथून तरुणाची सुटका केली आहे
