उपसरपंच वर्षा सोनवणे यांचा दिल्लीत विशेष सन्मान
मस्साजोग गावाच्या विकासकामांमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतरही गावाने विकासकामांची गती कायम ठेवली. या कामांची दखल घेत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने उपसरपंच वर्षा सोनवणे यांचा दिल्लीत विशेष सन्मान केला. त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्यांपैकी एक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर वर्षा सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
मारेकरांना कठोर शिक्षा द्या - वर्षा सोनवणे
अण्णा असले तर अण्णाचा सत्कार झाला असता. ते नाहीत म्हणून आम्हाला वाईट वाटतंय. अण्णाने पाणी पुरवठ्याचं काम केलं. पाणी फाऊंडेशनच्या वतीने कामं केली. त्यामुळे आमच्या गावाची पाण्याची पातळी वाढली, असं वर्षा सोनवणे यांनी म्हटलं आहे. आम्ही निस्वर्थी भावनेनं काम केलं. संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
अण्णा असते तर त्यांना दिल्लीत...
मी उपसरपंच आहे, पण मला त्या मारेकऱ्यांना माझ्या हातानं मारावं वाटतंय. आज अण्णा असते तर आनंद झाला असता, असं वर्षा सोनवणे म्हणाल्या. आमच्या गावासाठी मानाचा पुरस्कार आहे. अण्णा नसल्याने मोठी पोकळी निर्माण झालीये. अण्णा असते तर त्यांना दिल्लीत पाठवलं असतं. मी बीडला गेल्यावर अण्णाच्या घरी जाणार, असंही वर्षी सोनवणे म्हणाल्या.