या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करत आहेत. आरोपींकडून एक-एक करून दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केले जात असल्याने, सुनावणी अनावश्यकपणे लांबवली जात आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जात असून, प्रकरणाचा निकाल लवकर लागावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची देखील हत्या झाल्याचा खळबळजनक दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. बांगर यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभागी असल्याचा दावा केला होता. महादेव मुंडे हत्या प्रकरणात जो समोर येईल त्याला संपवण्याचे काम वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने केले आहे, असा आरोप देखील करण्यात आलाय.
advertisement
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
July 22, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : वाल्मिक कराडला 'जोर का झटका', तुरूंगातील मुक्काम वाढला; कोर्टातून आली मोठी माहिती