1 लाख रुपयांची ऑफर आणि कराचीचे लोकेशन
मेसेज पाठवणाऱ्या संशयिताने आपण पाकिस्तानी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपले कराचीमधील लोकेशनही तरुणाला पाठवले. एवढेच नाही, तर या कटात सहभागी होण्यासाठी त्याने १ लाख रुपयांची ऑफर दिली. "या कामासाठी आपल्याला ५० लोक हवे आहेत. प्रत्येकाला १ लाख रुपये दिले जातील आणि मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्सही पुरवले जाईल," असं संशयिताने मेसेजमध्ये म्हटले आहे.
advertisement
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटले?
संशयिताने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं की, "सोचके बताओ, हमारा साथ दो, मूंह खोल तुझे अमाउंट चाहिये. हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उड़ाना है. इस काम के लिए हमे पचास बंदे चाहिये, आरडीएक्स पोहोच जायेगा. जो बंदे काम करेंगे उनको एक-एक लाख मिलेगा.' जर तू करू शकणार नसशील तर दुसरा कुणाचा नंबर देऊ शकतो.., असंही समोरील व्यक्तीने सांगितलं.
आता ही मेसेजवरील व्यक्ती नक्की कोण आहे? ती खरीच पाकिस्तानची रहिवासी आहे का? त्यांचा राम मंदिरवण्याचा डाव आहे का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. मेसेज पाठवणारा व्यक्ती खरोखरच पाकिस्तानचा आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पण एका भारतीय तरुणाला अशाप्रकारे पाकिस्तानमधून ऑफर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
