ही घटना बीड जिल्ह्यातील दगडवाडी इथं घडली. दीपक केरा भिल्ला असं हत्या झालेल्या 19 वर्षीय मेंढपाळाचं नाव आहे. त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
नेमकी घटना काय आहे?
दीपक केरा भिल्ला (वय 19) असे खून झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी होता. कामासाठी तो नाशिक येथे मेंढपाळ म्हणून काम करत होता. सध्या त्याच्या मेंढ्या बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी शिवारात होत्या. पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.
advertisement
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास पाटोदा पोलीस करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे आणि हत्यांच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.