TRENDING:

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated:

मंदा म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच अपोलो रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा  झटका आला असून, त्यांना तातडीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
News18
News18
advertisement

मंदा म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉल करून मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.  मंदाताई, आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, त्यामुळे आपल्याला काहीही होणार नाही. आपण लवकरच पूर्ण बऱ्या होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल, अशा शब्दांत शिंदेंनी त्यांना दिलासा दिला.

advertisement

कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी

मंदा म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच अपोलो रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, रुग्णालयाने संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कोणालाही भेटू न देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हात्रे या नवी मुंबईतील राजकारणातील एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी विविध ठिकाणी प्रार्थना केली जात आहे.

advertisement

प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी  दिली हेल्थ अपडेट 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वामी समर्थ भक्तांसाठी एक सुवर्णयोग, पुण्यात सूर्यमणी आणि पादुकांचे घेता येणार दर्शन, काय आहे महात्म्य?
सर्व पहा

रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदा म्हात्रे यांच्यावर मध्यरात्री मंदा म्हात्रे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. तब्येत उत्तम असल्याचा डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्यांना काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, अपोलो रुग्णालयात उपचार सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल