TRENDING:

लाडक्या बैलांना सजवण्याचं राहुन गेलं, 3 बहिणींचा एकुलता भाऊ बाजारात गेला, परत आलाच नाही!

Last Updated:

वसंतवाडी गावात पवन गोपाल सुर्यवंशी हा मुलगा आपल्या आई- वडिलांसह वास्तव्याला होता. सध्या तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: पोळासणानिमित्त बैलांसाठी गोंडे आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पहायला मिळालं. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन गोपाल सुर्यवंशी असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सुर्यवंशी हा मुलगा आपल्या आई- वडिलांसह वास्तव्याला होता. सध्या तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आई- वडील शेती करून उदरनिर्वाह करतात. पोळा निमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती. त्यामुळे पवन सुर्यवंशी हा बैलांसाठी कासरा आणि गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत दुचाकीने वावडदा इथं गेला. बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर परत येत असतांना वाडवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला . हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेवून पसार झाला होता.

advertisement

(नदीच्या पुरात ट्रॉलीसह ट्रॅक्टर गेला वाहून, जळगावमधला VIDEO VIRAL)

तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आई- वडिलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे.

बैलाला नदीवर आंघोळीला घेऊन गेलेल्या 2 शेतकऱ्यांचा नदीत बुडून मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

दरम्यान, पोळ्याच्या दिवशी बैल सजवले जातात. त्याआधी त्यांना आंघोळ घातली जाते. त्या निमित्य आपले बैल धुण्यासाठी 2 शेतकरी नदीवर घेऊन गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोन्ही शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (वय ३२) तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) अशी मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोन्ही शेतकऱ्याचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडक्या बैलांना सजवण्याचं राहुन गेलं, 3 बहिणींचा एकुलता भाऊ बाजारात गेला, परत आलाच नाही!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल