TRENDING:

BJP Bhandara :भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले? भाजपची मोठी खेळी, शिंदे गटालाही मिळणार शह

Last Updated:

Bhandara News : भाजपच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागील काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. भाजपच्या या निर्णयामागे शिंदे गटाला कटशह देण्याचा उद्देश्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भंडारा: आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच महायुतीने धक्कातंत्राचा वापर करत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भाजपच्या नेतृत्त्वाने घेतलेल्या या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भाजपने ही स्मार्ट खेळी खेळली. भाजपच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागील काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. भाजपच्या या निर्णयामागे शिंदे गटाला कटशह देण्याचा उद्देश्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले? भाजपची मोठी खेळी, शिंदे गटालाही मिळणार शह
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले? भाजपची मोठी खेळी, शिंदे गटालाही मिळणार शह
advertisement

भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री बदलण्यामागे राजकीय आणि स्थानिक असंतोषाची पार्श्वभूमी ठळकपणे दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना हटवून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. अलीकडेच भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही सावकारे जिल्ह्यात दाखल झाले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती. “भंडाऱ्याची जाण असणाऱ्या आणि जवळच्या जिल्ह्यातील एखाद्या मंत्र्याला पालकमंत्री करा,” अशी मागणी नागरिकांनी उघडपणे केली होती.

advertisement

संजय सावकारे हे जळगाव जिल्ह्याचे असल्याने भंडाऱ्याला पुरेसा वेळ देण्यात ते कमी पडले, अशी भावना स्थानिकांमध्ये होती. जिल्हा विकासाशी संबंधित ठोस निर्णय घेण्यातही त्यांची भूमिका अपुरी ठरल्याची चर्चा होती. परिणामी, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढू लागली होती.

येत्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद मजबूत करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. पंकज भोयर हे विदर्भातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात राहणारे नेते मानले जात असल्याने, त्यांच्याकडून जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे. पंकज भोयर हे यांच्यावर आमदार परिणय फुके यांच्यासोबत समन्वय राखत भंडाऱ्यात पक्ष बळकटी करावी लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Bhandara :भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले? भाजपची मोठी खेळी, शिंदे गटालाही मिळणार शह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल