Mahayuti Govt: महायुतीचं धक्कातंत्र! 'या' जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, चर्चांना उधाण
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच महायुतीने धक्कातंत्र दिले आहे. राज्य सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी, भंडारा: आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच महायुतीने धक्कातंत्र दिले आहे. राज्य सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
संजय सावकारे यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांना अचानक भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून दूर करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भंडाऱ्यात सावकारेंना बदलण्यामागे नेमके कारण काय, याबाबत विविध कयास लावले जात आहेत.
पंकज भोयर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भोयर हे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच पालकमंत्री बदलण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
पंकज भोयर हे दोन वेळेस वर्धा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले आहेत. भोयर यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. संजय सावकारे हे भुसावळ मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत पहिल्यांदा विधीमंडळात प्रवेश केला. सध्या महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा भार आहे.
महायुतीमध्ये नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदावरून तिढा आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमनेसामने आले आहेत. तर, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा आहे. शिंदे गटानेही आपला या ठिकाणी हक्क सांगितला आहे. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत.
Location :
Bhandara,Bhandara,Maharashtra
First Published :
August 26, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahayuti Govt: महायुतीचं धक्कातंत्र! 'या' जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, चर्चांना उधाण