हॉल तिकीट मिळणार कसे?
मंडळाच्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत. मात्र, ही हॉल तिकीटे थेट विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायची नसून संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनीच ती डाउनलोड करायची आहेत. त्यानंतर हॉल तिकीटांचे प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन हॉल तिकीट देण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.
advertisement
हॉल तिकीत घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही आणि अधिकृत शिक्का असणे बंधनकारक आहे. फोटो असलेल्या हॉल तिकिटावर सही आणि शिक्का नसल्यास ते हॉल तिकीट वैध मानले जाणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे आवश्यक आहे. हॉल तिकीट नसल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.inउघडावी. त्यानंतर होमपेजवरील 'HSC Hall Ticket 2026' या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून लॉगिन करावे. स्क्रीनवर दिसणारे हॉल तिकीट नीट तपासून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी.
