पाच वर्षांसाठी कोकणचा प्रवास होणार सोपा
नवीन निर्णयानुसार गाडी क्रमांक 02198 जबलपूर-कोइम्बतूर ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 6 मार्च 2026 ते 27 डिसेंबर 2030 या कालावधीत धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 02197 कोइम्बतूर-जबलपूर ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 9 मार्च 2026 ते 30 डिसेंबर 2030 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच पुढील पाच वर्षे ही ट्रेन नियमितपणे कोकण रेल्वे मार्गावर धावेल.
advertisement
'हे' असतील थांबे
या गाडीचे प्रमुख थांबे नरसिंगपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासारगोड, कोझिकोड, शोरनूर आणि पालघाट आदी महत्त्वाच्या स्थानकांवर असणार आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनच्या वेळापत्रकात, थांब्यांत, धावण्याच्या दिवसांत किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही ट्रेन पूर्वीप्रमाणेच चालणार आहे. या निर्णयामुळे कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवास नियोजन आता अधिक सोपे आणि निश्चित होणार आहे. सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
