दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामागे पराभवाची साडेसाती कायम आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. पण त्याला लोकसभा निवडणुकीत साजेशी कामगिरी करता आली नाही. लोकसभेनंतर आता नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत देखील अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण १३ नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत. यातील केवळ ४ नगर परिषदांमध्ये भाजपला विजय मिळवता आला. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांकडून भाजपला अनेक अपेक्षा होत्या. पण त्यांना म्हणावा तसा विजय मिळवता आला नाही. त्यांना केवळ आपला बालेकिल्ला असलेला भोकर आणि मुखेडचा गड राखता आला. इतर ठिकाणी त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement
नांदेडमधील विजयाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर याबाबत स्वत: अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला आनंद आहे, मी प्रवेश केल्यानंतर माझा मतदारसंघ पूर्णपणे भाजपमय झाला. काँग्रेसमध्ये असताना ज्या नगरपालिका चांगल्या मताधिक्याने जिकल्या होत्या. त्या नगरपालिका जिंकून आणल्या आहेत. संबंधित ठिकाणी काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. तुरळक विषय सोडले तर जिल्ह्यात भाजप चांगल्या स्थितीत आहे. काही ठिकाणी पराभव झाला आहे. पण आगामी महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करू, असंही चव्हाणांनी म्हटलं.
