पुण्यात नुकतीच पार पडलेली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. या बैठकीत संघटनेच्या पुढील दिशा आणि कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या दोन दिवसात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.
काही महिन्यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
advertisement
राज्यात महापालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत विविध स्तरांवर निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला अधिक बळकट देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभे करण्यासाठी भाजपकडून संघटनेत पुनर्रचना केली जात आहे.
यादीनंतर स्थानिक पातळीवर पक्ष अधिक सक्रिय आणि संघटित स्वरूपात काम करेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप संघटनेवर अधिक काम करणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले.
काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आपला पक्ष वाढवा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजब सल्ला
काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आपला पक्ष वाढवा, असा अजब सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आपला पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःचा पक्ष वाढविण्याची क्षमता आता राहिली नाही, काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही, उद्धव ठाकरेंचे शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत. त्यांना त्यांचा पक्ष संभाळता येत नाही. आपल्या पक्षात पक्षप्रवेशाच्या रांगा लावा, असे बावनकुळे म्हणाले.