छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीगनर महापालिका निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने झेंडा फडकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं जागापाटपावरून केली खेचाखेची चांगलीच महागात पडली आहे. भाजपने शिवसेनेला आता महापालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पहिल्यांदाच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला फक्त दोन जागांची गरज आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. अखेरीस ६ तासांच्या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक ५६ जागा जिंकल्या आहे. बहुमतासाठी ५८ जादुई आकडा गाठवा लागणार आहे. भाजपला फक्त २ नगरसेवकांची गरज आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा हा ऐतिहासिक असा विजय आहे. पहिल्यांदाच भाजप स्वबळावर आपला महापौर बसवणार हे आता स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण, जागावाटपावरून दोन्ही गटामध्ये वाद ताणला गेला. त्यामुळे भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केला. आतापर्यंत शिवसेना हा पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरत होता. पण, यंदा शिवसेनेला फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले. तर ठाकरे गटाला इथं ६ जागाच जिंकता आल्या आहे. तर एमआयएम हा दोन नंबरचा पक्ष ठरलाा आहे. एमआयएमने आतापर्यंत सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहे.
शिवसेनेला फटका का बसला?
पालिका निवडणुकीसाठी जागावाटपावरून दोन्ही गटामध्ये एकीकडे रस्सीखेच झाली तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये नाराजांची फौज तयार झाली होती. अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे उघडपणे इच्छुक उमेदवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली तरी काही जणांनी पक्ष कार्यालयात आंदोलन केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमधलं हे दृष्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं. अखेरीस याचे परिणाम आता निकालात झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर पालिकाचा आतापर्यंतचा निकाल 115/ 102
भाजप : 56
शिवसेना : 14
शिवसेना UBT : 6
एमआयएम : 24
काँग्रेस : 1
राष्ट्रवादी : 0
राष्ट्रवादी SP : 1
वंचित बहुजन आघाडी 4
इतर 0
भाजपच्या विजयाचं कारण?
विशेष म्हणजे, भाजपकडून मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांनी निवडणुकीची पूर्ण जबाबदारी सांभाळली होती. भाजपमध्येही मोठी बंडखोरी झाली होती. नाराज उमेदवारांची फौज तयार झाली खरी पण वेळीच सगळ्यांची मनधरणी करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं. तर दुसरीकडे शहरामध्ये भाजपने विकासाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेऊन प्रचार केला होता. वाळूज, शेंद्रा एमआयडीसी, समृद्धी महामार्ग आदी कामांचा दाखल देत भाजपने मतदारांना आकर्षित केलं. संभाजीनगर शहराच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे, याचं श्रेय हे भाजपला जात आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते आणि संघाचं जाळं हे विधानसभा निवडणुकीनंतर वाढत गेलं, त्याचा फायदा हा भाजपला मतदानात झाला.
