राहुरी तालुक्यात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देत वरील वक्तव्य केले. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले. त्याचमुळे विखे यांना संगमनेरमधून विधानसभेची उमेदवारी मिळू शकली नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान फिरले
मार्च महिन्यापर्यंत सगळं बरं चाललं होतं. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान फिरले. जरा काही शिजले की कुणी तरी भरल्या पातेल्याला लाथ मारते, असे सुजय विखे म्हणाले. माझ्या नशिबात सध्या काही तरी गडबड चालू आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभेला वातावरण चांगलं असूनही माझा पराभव झाला, म्हणून आमदार व्हायचं ठरवलं होतं
लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगले वातावरण असतानाही माझा पराभव झाला. त्यानंतर आमदार व्हायचं ठरवलं. संगमनेर तालुक्यात लक्ष केंद्रित केले. संगमनेरमध्येही माझ्या सभांना गर्दी पाहून ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण मध्येच वसंत देशमुखांनी उठून शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली आणि तेही राहून गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संगमनेरमधून सुजय विखे यांना तिकीट मिळणार होतं पण देशमुख यांनी वक्तव्य केलं अन्...
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून पराभव झाल्यावर सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शड्डू ठोकून संगमनेरमधून तयारी सुरू केली होती. मात्र स्थानिक नेते देशमुख यांनी थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह विधान केल्याने सुजय विखे यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा आहे.
