TRENDING:

गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ, गाडी अंगावर आणल्याचा आरोप, जोरदार राडा

Last Updated:

Gopichand Padalkar vs Gopichand Padalkar: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा होणे अपेक्षित असताना दोन आमदारांमध्ये वाद होऊन प्रकरण शिवीगाळीपर्यंत गेले. ही घटना उत्तर प्रदेश किंवा बिहार राज्यातली नाही. ही घटना आहे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातली....
जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर
जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर
advertisement

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केली. विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या समोरील प्रांगणात हा सगळा प्रकार घडला. दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अगदी एकटा ये मग तुला बघतो.... इथपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले सत्तापक्षातील आमदार महोदयांची भाषा गेली.

नेमकं काय घडलं?

advertisement

विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळून जितेंद्र आव्हाड पायी निघाले होते. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी गाडी थेट आव्हाड यांच्या दिशेने आली. पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जोरात पायाला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्यावर आव्हाड यांनी पडखळकरांना जाब विचारला.

गाडीचा दरवाजा पायाला लागल्याच्या मुद्द्यावरून पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार शा‍ब्दिक वाकयुद्ध रंगले. मी एकटाच आहे, कधीही ये... तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही... अशी भाषा पडळकर यांनी वापरली. आव्हाड यांचाही तोल गेला. त्यांनीही शिवराळ भाषेत पडळकर यांना सुनावले. मी आयुष्यभर मुंबईत राहिलोय. धमकी कुणाला देतो... असे आव्हाड पडळकरांना म्हणाले.

advertisement

मी मंगळसूत्र चोर म्हटले होते. त्याचा राग गोपीचंद पडळकर यांना का यावा? असा सवाल विचारीत पडळकरांनी माझ्या अंगावर गाडी का आणली. त्यांनी जर माझ्या दिशेने गाडी आणली नसती तर हे प्रकरण घडलेच नसते, असे म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड यांचाही संयम सुटला. त्यांनीही पडळकर यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला.

advertisement

विधानसभेतही आव्हाड विरुद्ध पडळकर सामना

गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले. सत्ताधारी पक्षातला एक आमदार ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करतो. त्यामुळे संपूर्ण समाज घाबरलेला असून ख्रिस्ती लोक आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. पडळकर यांच्यावर सरकार काही कारवाई करणार आहे का? असे जितेंद्र आव्हाड यांनी विचारले. त्यावर सत्ताधारी पक्षाने हिंदूंवर अन्याय होतो, त्यावेळी आव्हाड यांच्या तोंडातून ब्र का निघत नाही? असे विचारीत पलटवार केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ, गाडी अंगावर आणल्याचा आरोप, जोरदार राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल