TRENDING:

Solapur: निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपमध्ये असं घडलं, सोलापूरमधून धक्कादायक बातमी!

Last Updated:

सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.  

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर : सत्ताधारी भाजपमध्ये नेमकं काय चाललंय, हे आता कळायला मार्ग नाही. एकीकडे निवडणुकीआधी आयारामांची गर्दी आणि तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी यामुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. अशातच आज शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापूर महापालिकेमध्ये मोठा ड्रामा घडला आहे. भाजपच्या अंतर्गत वादातून उमेदवाराचं संपर्क कार्यालय फोडण्यात आलं आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.  सोलापुरातील प्रभाग क्रमांक २ मधील भाजप उमेदवार संपर्क कार्यालयाची राजकीय वादातून तोडफोड झाली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला पोहोचला होता. याच वादातून शालन शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची भाजपच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे.

advertisement

घरात येऊन केली मारहाण

आमच्या सासऱ्यांनी बोलून घेतलं होतं. सकाळी त्यांनी बोलून घेतलं, तिकीट मागे घेतो. पैसे देतो, ३ लाख रुपये देतो, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सासऱ्याच्या अंगावर धावून गेले, घरी येऊन मारहाण केली. मागे पोरं सुद्धा घेऊन आले. त्यांना तिकीट पाहिजे होतं,. आता आम्हाला तिकीट मिळाल्यामुळे त्यांच्या पोटात आग पडली आहे. त्यांनी आमच्या घरात येऊन आम्हाला मारहाण केली आहे. चाकू, हत्यार घेऊन आले होते, असा आरोप शालन शंकर शिंदे यांनी केला.

advertisement

नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

तर दुसरीकडे नाशिकमध्येही चित्र काही वेगळं नव्हतं. नाशिकमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी भारतीय जनता पक्षातील दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 31 मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्या समवेत आपला अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी आले असता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून याच प्रभागातून अधिकृत उमेदवारी मिळालेले बालम उर्फ बाळा शिरसाट उभे होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दहा बाय दहाच्या खोलीत सुरू केला व्यवसाय, पोहोचला मॉलपर्यंत, अविनाश यांची कहाणी
सर्व पहा

यावेळी या एकाच पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर बालम उर्फ बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. यानंतर पोलीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ही हाणामारी सोडवली आणि  दोन्ही पदाधिकाऱ्यांना आजूबाजूला केलं. मात्र एकाच पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीनंतर हा सगळा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपमध्ये असं घडलं, सोलापूरमधून धक्कादायक बातमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल