चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस उमेदवार अलका वाढई यांचा 215 मतांनी विजय झाला आहे. या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाने ताकद दिली नाही, असा आरोप केला होता. या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
advertisement
"चंद्रपूरचा विषय आहे, त्या संदर्भात ज्या नगरपालिकामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. त्या कारणाचा विचार करू, कारण आता महापालिकेची निवडणूक आहे. कुठे कमी पडलो तिथे नक्की कमतरता पूर्ण करू. पक्षाने बळ दिलं नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. असं नाही, पक्षाची दारं कुठल्या समाजासाठी बंद नाही. कुठल्या व्यक्तीसाठी बंद नाही. फक्त प्रवेश देताना व्यक्ती फायद्याचा आहे का नाही, याचा विचार केला पाहिजे होता' असं म्हणत म्हणत फडणवीस पराभवावर नाराजी व्यक्त केली.
तसंच, 'काही ठिकाणी पक्षाने इतर लोकांना प्रवेश दिला आहे, त्याचा फायदा झाला आहे. पण सुधीरभाऊंना कुठली ताकद कमी झाली असेल तर त्याची भरपाई चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकद देऊन तिथे विजय मिळवू' असं आश्वासनच फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना दिलं.
कोकणात का पराभव झाला?
'कोकणात रत्नागिरीत महायुतीत लढलो, सिंधुदुर्गात वेगळं लढलो, आता काही ठिकाणी जिंकलो काही ठिकाणी हरलो. पण काही ठिकाणी जिंकलो. कोकणामध्ये आमची टॅली कमी दिसतेय. तिथे महायुतीत लढलोय. काही ठिकाणी शिवसेनेचा, कुठे राष्ट्रवादीचा उमेदवार होता. त्यामुळे तसं दिसलं' असं म्हणत फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांच्या पराभवावर भाष्य केलं.
