TRENDING:

Raj Thackeray : राज ठाकरेंचा वार जिव्हारी लागला, भाजपने 'ते' फोटो केले ट्वीट

Last Updated:

राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर नव्या वादाला तोंड फुटलंय, भाजपने देखील राज ठाकरेंनाी पलटवार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा रविवारी शिवाजी पार्कात पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत घणाघाती भाषण करत उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधला आहे.अदानींच्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपने देखील राज ठाकरेंनाी पलटवार केला आहे.
News18
News18
advertisement

गेल्या 10 वर्षांत अदानींनी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात कसा विस्तार केला. याचं प्रेझेंटेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं. अदानी समुहाचा विस्तार कोणाच्या पाठिंब्यामुळे झाला ? असा सवाल करतानाच राज ठाकरेंनी भविष्यातील भीतीही व्यक्त केली. त्यानंतर नितेश राणेंचा हल्लाबोल केला आहे. ठाकरेंना अदानी चालत नाही .. पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो! मुंबईकरांनी सावध राहिले पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.

advertisement

मोदी आणि भाजपवर केलेल्या आरोपांनंतर महायुतीतील शिवसेनेनेही पुढे येत ठाकरे बंधूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी गौतम अदानींना टार्गेट करुन एकच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडं त्यांनी अदानी समुहावर सरकारच्या विशेष मेहेरबानीवरचा पडदा हटवलाय. तर दुसरीकडं अदानींना दिलेल्या जात असलेल्या जमीनींच्या मुद्यावर बोट ठेवलं आहे. राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या स्वाभिमानावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे.

advertisement

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?
सर्व पहा

राज ठाकरे म्हणाले, 2014 ते 2024 या काळात अदानी उद्योग समूहाला देशात आणि मुंबईत किती प्रोजेक्ट मिळाले? याची A टू Z यादी सांगितली. आपल्याला कशाप्रकारे आवळलं जात आहे ते आपल्याला कळत नाही. वाढवणला बंदर येत आहे. बाजूला विमानतळ कशासाठी? नवी मुंबईच्या विमनतळाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतूक करणार आणि मुंबईचे संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क बसतील एवढा प्लॉट आहे. धारावीला लागून आहे. अशी मुंबई नाही मिळवता येत तर बदाबदा पैसे टाकून मुंबई मिळवता येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : राज ठाकरेंचा वार जिव्हारी लागला, भाजपने 'ते' फोटो केले ट्वीट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल