वर्धा येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत धडा शिकविल्याचा कांगावा सरकार करत आहे. पण पाकव्याप्त भाग पुन्हा न घेता कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारला जे अपयश आलंय हे लपविण्यासाठी आता सरकारनं तिरंगा यात्रा सुरू केली आहे, अशी टिका माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली.
advertisement
बच्चू कडू यांनी म्हटले की, पहलगाममध्ये सुरक्षा यंत्रणेत त्रुटी होती. सरकारनेदेखील ही बाब मान्य केली आहे. पहलगाममध्ये त्या ठिकाणी किमान सुरक्षा व्यवस्था असती तरी लोकांचे प्राण वाचले असते. या त्रुटीमुळेच 28 जणांचा मृत्यू झाला. पहलगाममधील हे अपयश लपवण्यासाठी भाजपची तिरंगा यात्रा सुरू असल्याची टीका कडू यांनी केली.
भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढली जात आहे. या तिरंगा यात्रेत अनेक मंत्री, आमदार, नेते सहभागी होत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसनेदेखील जय हिंद यात्रेची घोषणा केली आहे. भाजपकडून सैन्यांच्या शौर्याचे राजकारण सुरू असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.