नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका ही महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. मालेगाव महापालिकेची निवडणूक यंदा विशेष होी. मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारत खासदार असाउद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मालेगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं चांगली कामगिरी केली आहे. पण भाजपला इथं मोठा धक्का बसला आहे.
advertisement
मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारत 84 पैकी 35 जागा पटकावल्या आहेत. एमआयएमची पीछेहाट होऊन त्यांना 21 जागा मिळाल्या आहे. शिवसेनेनं 24 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 18 उमेदवार विजयी झाले आहे. समाजवादी पार्टीचे 5 उमेदवार निवडून आले असून सर्वात जास्त फटका भाजपा बसला आहे.
भाजपने मालेगाव महापालिका निवडणुकीत 24 जागावर निवडणूक लढवली होती. भाजपच्या प्रमुख नेते आणि आमदारांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता. पण इथं फक्त 2 उमेदवार निवडून आले. तर मुस्लिम मतदार हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे. पण मालेगावमध्ये काँग्रेसला 3 जागा राखता आल्या आहेत.
या निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी युतीकरून 56 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहे. बहुमतासाठी 43 नगरसेवकांची गरज असल्यामुळे माजी आमदार असिफ शेख कोणाची मदत घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, निकाल जाहीर होताच शिवसेना आणि इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या तर माजी आमदार आसिफ शेख यांनी इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांचे अभिनंदन करून सत्कार केला आहे.
मालेगाव पालिकेचा निकाल
एकूण जागा:-84
बहुमतासाठी :-43
इस्लाम पार्टी: -35
एमआयएम:-21
शिवसेना(शिंदे -(18
समाजवादी पार्टी -5
काँग्रेस -3
भाजप :-2
