'ब्लॅक पँथर' ही वेगळी प्रजाती नाही आहे. तर बिबट्या आणि जॅग्वार या प्राण्यांची काळ्या रंगाची प्रजाती आहे. पण हा काळ्या रंगाचा बिबट्या सर्वच ठिकाणी सापडत नाही. मोजक्याच ठिकाणी हा बिबट्या सापडतो.तसेच या प्रकारच्या प्राण्यांची प्रजातीही नष्ट होत चालली आहे. त्यामुळेच हे प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख रत्नागिरी मार्गावर मौजे पाटगाव या ठिकाणी दुर्मिळ काळा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' सापडला आहे. हा बिबट्या जखमी अवस्थेत आढळला आहे. तसेच नर जातीचा हा 'ब्लॅक पँथर' आहे. आणि हा बिबट्या एक वर्षांचा आहे.
advertisement
स्थानिकांनी बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.सध्या त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत उपचार सूरू आहेत.वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगट परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या दुर्मिळ ब्लॅक पॅंथर म्हणजेच काळा बिबट्यावर उपचार सुरू आहेत
दरम्यान हा बिबट्या सापडल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.तसेच हा बिबट्या सापडल्यानंतर आता त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे की नाही, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे.