छत्रपती संभाजीनगर शहरातील 'सरस्वती भुवन महाविद्यालया'मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित अगदी पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या ठिकाणी तत्कालीन मराठवाडा दैनिकाचे दुर्मिळ अंक देखील ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यामधील नागरिकांनी आपल्या जुलमी निजामाविरोधात कसा संघर्ष केला, याची माहिती आणि वर्णन असलेली पुस्तकं या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत. काही दुर्मिळ पुस्तकांचा देखील यामध्ये समावेश आहेत. काही वृत्तपत्रांचे 1948 पासूनचे अंकसुद्धा या प्रदर्शनांमध्ये मांडण्यात आले आहेत.
advertisement
Marathwada Mukti Sangram: 1947 नंतर 13 महिन्यांनी मराठवाडा झाला स्वतंत्र, MIM पक्ष होता व्हिलन!
प्राचार्य डॉक्टर विवेक मिरगणे म्हणाले, "आपल्या येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळवा यासाठी दरवर्षीप्रमाणे मी यंदाही पुस्तक प्रदर्शन भरवलं आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हे प्रदर्शन बघू शकतात. त्यांना एखादं पुस्तक आवडल्यास तर त्यांना ग्रंथालयामधून ते वाचण्यासाठी देखील मिळेल. विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य नागरिकांसाठी देखील हे पुस्तक प्रदर्शन खुले असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी."
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला होता. तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सरस्वती भुवन महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकरलं जाणार नाही.