विकी मुख्यदल हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा या गावचे रहिवाशी होते. मागील सात वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. रेल्वे विभागात कार्यरत असतानाच ते कामावरून परतत होते. तेव्हा झालेल्या दुर्दैवी अपघातात विकी यांचा मृत्यू झाला. आज, 10 जून रोजी सकाळी त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
advertisement
Pimpal Purnima: ही बायको 7 काय एक क्षण देखील नको! पती लोकांकडून पिंपळाला उलट्या फेऱ्या
विकी यांचा वाढदिवस दोन-तीन दिवसाआधीच झाला होता. तर त्यांच्या चार वर्षाच्या मुलाचा 17 जून रोजी वाढदिवस आहे. त्यासाठी विकी आणि त्यांच्या पत्नीने जय्यत तयारी केली होती. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सासू-सासर्यांना मुंबईत बोलवलं होतं. मुलाच्या वाढदिवसा आधीच विकी यांच्यावर काळाने घाला घातल्याने मुलगा अनाथ तर पत्नी दीपाली आधारहीन झाल्या.
सगळं तसंच राहिलं.
“रात्री दोन वाजता विकी हे ड्युटीसाठी गेले होते. काम आटोपून सकाळी ते घराकडे निघाले होते. मी घरी येतोय काय आणायचं असं त्यांनी फोनवर विचारलं होतं. 17 तारखेला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही त्याची पूर्ण तयारी केली होती. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाहेर शॉपिंगसाठी जाणार होतो. परंतु त्यांच्या जाण्याने सगळं जागच्या जागीच राहिले, अशा शब्दांत पत्नी दीपाली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.