राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव आणि नांदुरा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केस गळतीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. केस गळतींच्या कारणांचा शोध घेत असताना अनेकांनी दूषित पाण्यामुळे केस गळतीचा प्रकार होत असल्याचा कयास लावला होता. तसेच अन्य कारणांचा देखील आरोग्य विभागामार्फत शोध घेतला जात होता. मात्र केस गळतीचं खरं कारण हे रेशन मार्फत वितरित केले गेलेले गहू असल्याचे समोर आल आहे.
advertisement
पुण्यात गुंडगिरीचा उच्छाद, पोलिसांनी तुमच्यासाठी आणली खास सेवा, संपूर्ण माहिती
रेशन दुकानांमार्फत नागरिकांना वितरित करण्यात आलेल्या गव्हामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सेलेनियम आढळला आहे. ज्यामुळेच नागरिकांच्या डोक्यावरील केसांची गळती झाल्याचा शोध संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी लावला आहे. तसेच केस गळतीच्या या प्रकरणावर सरकारकडून देखील प्रचंड गोपनीयता बाळगली जात असून बुलढाणा जिल्ह्याला रेशनद्वारे धान्य वितरित करणाऱ्या गोदामांना कुलूप ठोकण्यात आल आहे. या प्रकरणाचा थेट पंजाब हरियाणा संबंध असल्याचे सांगितले जात आहे.