TRENDING:

वडिलोपार्जित मालमत्तेतून मुलांचे नाव काढून टाकता येते का? नियम काय आहे?

Last Updated:

Property Rules : वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क कोणाचा? वारसा कसा वाटला जातो? नावे काढून टाकता येतात का? यासारखे प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये वादाचे कारण ठरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क कोणाचा? वारसा कसा वाटला जातो? नावे काढून टाकता येतात का? यासारखे प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये वादाचे कारण ठरतात. विशेषतः मुलांची नावे वडिलोपार्जित मालमत्तेतून हटवता येतात का? याबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कायद्यानुसार अशा परिस्थितीत नेमके नियम काय आहेत आणि कोणत्या अटींवर नावे काढून टाकता येतात हेच आपण जाणून घेणार आहोत
property rules
property rules
advertisement

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?

ज्येष्ठ व्यक्तीकडून चार पिढ्यांपर्यंत मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून ओळखली जाते. म्हणजेच आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्या वडिलांकडून आलेली मालमत्ता ही वडिलोपार्जित म्हणून कायद्यात मानली जाते. अशा मालमत्तेत वारसांना जन्मतःच हक्क मिळतो.

मुलांचे नाव काढून टाकता येते का?

वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांचे नाव काढून टाकणे अत्यंत कठीण आहे, कारण या मालमत्तेवर मुलाचा हक्क जन्मजात असतो. एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच त्याला त्या मालमत्तेतील हिस्सा आपोआप मिळतो. त्यामुळे वडिलांना किंवा इतर कोणालाही त्याचे नाव मनमानीने काढून टाकण्याचा अधिकार नसतो.

advertisement

कधी काढता येते नाव?

काही विशेष परिस्थितीतच मुलांचे नाव वडिलोपार्जित मालमत्तेतून हटवता येऊ शकते जसे की,

त्यागपत्र - मुलगा किंवा मुलगी स्वखुशीने आपल्या हक्कावरून त्यागपत्र देऊ शकतो. हे फक्त लिहून देणे नाही, तर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंदवणे आवश्यक आहे.

नागरी कोर्टाचा आदेश मिळाल्यास - मुलाने कुटुंबावर गंभीर गुन्हे केले असल्यास, आर्थिक फसवणूक, हिंसा किंवा कायदेशीर कारणांमुळे न्यायालय नाव काढून टाकण्याचा आदेश देऊ शकते.

advertisement

जर मालमत्ता वडिलोपार्जित नसून स्वत:चे कमावलेली असेल तर

स्वतः कमावलेल्या मालमत्तेत वडिलांना त्यांचे वारस ठरवण्याचा पूर्ण हक्क असतो. अशा मालमत्तेत ते मुलाचे नाव कधीही हटवू शकतात किंवा मृत्यूपत्र करून संपत्ती इतर कुणालाही देऊ शकतात. यासाठी मुलाची परवानगी आवश्यक नसते.

मालमत्तेतून नाव काढून टाकण्यासाठी प्रक्रिया काय?

प्रथम संबंधित मालमत्तेचे स्वरूप ठरवले जाते. ती वडिलोपार्जित आहे की कमावलेली. जर वडिलोपार्जित असेल तर नाव काढण्यासाठी कायदेशीर कारणांची तपासणी होते. आवश्यक पुरावे आणि अर्जासह नागरी न्यायालयात केस दाखल करावी लागते.कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतरच नोंदणी कार्यालयात नाव वगळण्याची प्रक्रिया होते.

advertisement

नाव चुकीने नोंद झाल्यास?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

कधी कधी सरकारी नोंदणीमध्ये चुकीने एखाद्याचे नाव चढते. अशा वेळी तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो. तसेच आवश्यक कागदपत्रे (वारसा पुरावा, मालकी कागदपत्रे, आधार/ओळखपत्र) दाखल करून चौकशीद्वारे नावे दुरुस्त केली जाऊ शकतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वडिलोपार्जित मालमत्तेतून मुलांचे नाव काढून टाकता येते का? नियम काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल