छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 24 इथला निकाल थोड्याच वेळापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बहिण गंगाबाई भीमराव भागुरे विजयी जााहीर करण्यात आलं. त्यांच्यासोबत कमलताई रामचंद्र नरोटे, मुक्ता किसन ठूबे आणि सुनील देवदास जगताप हे संपूर्ण भाजपचं पॅनल विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
advertisement
पण गंगाबाई भागुरे यांच्या विजयावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी आक्षेप घेतला. मतमोजणी केंद्रावर एक तास मशीन बंद होती. त्यादरम्यान गडबड झाल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात जाऊन राडा घातला.
वंचित कार्यकर्त्यांनी असाही आरोप केला की, वंचितचं पॅनल विजयी घोषित करण्यात आलं होतं. पण, इथं भाजपच्या उमेदवारांनी फेर मतदान करण्याची मागणी केली. त्यानंतर जिंकलेलं वचितचं पॅनल पराभूत झालं, असा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता मतमोजणी कक्षा बाहेर वंचित उमेदवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या केला आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वंचितच्याा उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली आाहे.
