भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज बुधवारी त्याला यश आलं आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना आज प्रसिद्ध केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होतो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
advertisement
तसंच, खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.
“केंद्र सरकारकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटलं आहे.
धनंजय मुंडे राहणार भक्तीगडावर दसरा मेळाव्याला हजर
दरम्यान, आमदार धनंजय मुंडे भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. सकाळी श्री क्षेत्र भगवानगड येथे दर्शन घेणार आहे. दर्शनानंतर सावरगाव येथील भगवान भक्ती गडाकडे रवाना होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यास धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे. गतवर्षीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्या भाषणामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.