TRENDING:

शाळेत गेली अन् परतलीच नाही, जळगावात शाळकरी मुलीचा करुण अंत, रक्ताने माखला गणवेश

Last Updated:

Jalgaon News: जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव बस स्थानकात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथं एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी चाळीसगाव: जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव बस स्थानकात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथं एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. मात्र शाळेतून पुन्हा घरी येताना तिच्यासोबत अनर्थ घडला आणि यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

माधुरी शिवाजी मोरे (वय १३, रा. वडगाव लांबे, ता. चाळीसगाव) असं मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. माधुरी ही शाळेतून सुटल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकात आली होती. बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना, आपली बस पकडण्यासाठी ती धावली. बसमध्ये चढत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट चालत्या बसच्या चाकाखाली सापडली.

advertisement

उपचारादरम्यान मृत्यू

अपघात होताच बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने माधुरीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. एका उमलत्या वयातील मुलीचा असा करुण अंत झाल्याने वडगाव लांबे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

दोषींवर कारवाईची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

या घटनेनंतर माधुरीच्या पालकांनी आणि संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बस स्थानकावरील नियोजनाचा अभाव आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळेच आपली मुलगी गमावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोरे कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शाळेत गेली अन् परतलीच नाही, जळगावात शाळकरी मुलीचा करुण अंत, रक्ताने माखला गणवेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल