पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक बुधवारी संध्याकाळी पुण्यावरून नागपूर साठी निघाले होते. गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गणेशपुर शिवार पोहोचले असता, अचानक इथं 6 गाड्यांमधून दहा ते पंधरा लोकांनी ट्रॅव्हल्सची बस थांबवली. हे सगळे तरुण तोंडाला रुमाल बांधून होते. त्यांनी बस थांबवली आणि नगरसेवकांना शिवीगाळ करत आपल्या सोबत चालण्याची धमकी दिली. तसंच, जर आमच्या सोबत आले नाही तर मारून टाकण्याची धमकी दिली.
advertisement
त्यानंतर नगरसेवकांच्या गटाने जोरदार प्रतिकार केला. दोन्ही गटामध्ये झालेल्या वादानंतर नगरसेवकांच्या गटाने आरोपी पक्षातील एकाला पकडून ठेवलं आणि इतर सर्व आरोपी पळून गेलं. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वर्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी पकडून ठेवलेल्या कनैन सिद्दीकी (खापरखेडा, नागपूर जिल्हा) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे. सध्या सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात दाखल गुन्हा केला आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडुर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
