3 रुपयांमध्ये घ्या अन् 20 रुपयांना विका, महाहोलसेलचा हा घ्या पत्ता!
रेल्वे स्थानकाच्या फुड स्टॉलवर 15 रूपयामध्ये मिळणारी 'रेल नीर' पाण्याची बॉटल आता 14 रूपयांना मिळणार आहे. 'रेल नीर' हे बाटलीबंद पाणी 15 ऐवजी 14 रूपयामध्ये देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, जर ग्राहक फूड स्टॉलवर 'रेल नीर' पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेले असता ते ग्राहकाला एक रूपयाचे नाणे देण्याऐवजी एक रूपयाच्या किंमतीचं चॉकलेट हाती टेकवलं जात आहे. रेल्वे स्थानकांवर 'रेल नीर' पाण्याच्या बॉटलीची विक्री 14 रूपयांना होत असल्याची घोषणा झाली आहे. माध्यमांवर त्याची बातमीही प्रसारित झाली असता अनेक स्टॉलवर 15 ऐवजी 14 रूपयामध्ये बॉटल देण्यास नकार दिला जात आहे.
advertisement
फ्रेश फ्रुट्सच्या पॅकेटची होम डिलिव्हरी, नाशिकमधील तरुणीने सुरू केला व्यवसाय
22 सप्टेंबरपासून देशात दोन टप्प्यांमध्ये जीएसटी लागू करण्यात आला आहे. याचा लाभप्रवाशांना मिळावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक लिटर बाटली बंद पाणी 15 ऐवजी 14 आणि पाचशे मिलिलीटर बाटली बंद पाणी 10 ऐवजी नऊ रुपयांना विक्री करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय रेल्वे विभागांना देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, 22 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी केली जात आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण टर्मिनसमध्ये पाण्याच्या बॉटलबद्दलची उद्घोषणा करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर 'रेल नीर' पाण्याची बॉटल एक रुपयाने स्वस्त झाल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र स्थानकातील स्टॉलवर पाण्याची बॉटल घेण्यासाठी 20 रुपयांची नोट दिली असता एक रुपयाचं चॉकलेट आणि पाच रुपये हातावर टेकवले जात आहेत.
नोकरी गेली, अश्विनी यांनी सुरू केला ब्रँड, महिन्याला पगारापेक्षा जास्त कमाई
'रेल नीर' पाण्याच्या बाटलीवर मुळ छापील किंमत १५ रुपये इतकी आहे. तर, काही स्टॉल स्टॉलधारक छापील किंमतीवर बोट ठेवून नव्या स्टॉकमध्ये १४ रुपये असणार आहे, असे सांगून १५ रुपये वसूल करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातील स्टॉलवर रेल्वे प्रशासनाने अधिक प्रमाणात जनजागृती करावी, शिवाय प्रवाशांकडून अधिकचे पैसे वसूल करणाऱ्या स्टॉलधारकांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे.