मक्याचे उच्चांकी दर कायम, इतर ठिकाणी दरात घट
कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी राज्यात मक्याची एकूण आवक 28 हजार 370 क्विंटल इतकी झाली. आज मक्याची सर्वाधिक आवक नाशिक कृषी बाजारात नोंदविण्यात आली. नाशिक बाजारात आलेल्या 9 हजार 715 क्विंटल हायब्रीड मक्यास 1250 ते 1825 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. दरम्यान, मुंबई मार्केटमध्ये मक्याला आजही सर्वाधिक दर मिळाले. मुंबईत आवक झालेल्या 270 क्विंटल मक्यास किमान 2500 ते कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव नोंदविण्यात आला. गुरुवारी मिळालेला उच्चांकी भाव आजही कायम असून, इतर बाजारांमध्ये मात्र दरात घसरण दिसून आली आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्राला शनिवारी बसणार बर्फासारख्या लाटेचा तडाखा, हवामान खात्याकडून अलर्ट
कांद्याच्या दरात घसरण
आज राज्यातील कृषी बाजारात कांद्याची एकूण आवक 1 लाख 66 हजार 503 क्विंटल इतकी झाली. यापैकी लाल कांद्याची सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली असून ती 36 हजार 477 क्विंटल इतकी आहे. अहिल्यानगर बाजारात कांद्याला 317 ते 2447 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 14 हजार 627 क्विंटल कांद्यास 3100 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र गुरुवारी मिळालेल्या उच्च दराच्या तुलनेत आज कांद्याचा कमाल भाव काहीसा कमी झाला आहे. इतर बाजारांमध्येही दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
सोयाबीनच्या कमाल दरात पुन्हा घसरण
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 30 हजार 718 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. सोयाबीनची सर्वाधिक आवक अमरावती बाजारात झाली. अमरावती मार्केटमध्ये आलेल्या 5 हजार 238 क्विंटल सोयाबीनला 4000 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. दरम्यान, सातारा बाजारात आवक झालेल्या 56 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक दर मिळाला. मात्र गुरुवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.





