Success Story : नोकरीच्या शोधात केली भटकंती, शेवटी तरुणानं घेतला शेतीचा निर्णय, आता लाखात कमाई Video

Last Updated:

आजकाल उच्चशिक्षित तरुण नोकरी मिळत नसल्याने शेती करत असताना दिसत आहे. शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग करून पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत.

+
News18

News18

सोलापूर : आजकाल उच्चशिक्षित तरुण नोकरी मिळत नसल्याने शेती करत असताना दिसत आहे. शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग करून पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत. अशाच प्रकारची शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात राहणाऱ्या माऊली माने यांनी एका एकरात बीन्सची शेती केली आहे. बीन्स लागवडीसाठी 25 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर या बीन्स विक्रीतून उच्चशिक्षित तरुण माऊली माने यांना सर्व खर्च वजा करून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
मोहोळ तालुक्यात राहणाऱ्या माऊली माने यांचे शिक्षण पदवीधरपर्यंत झाले आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरीच्या शोधात जवळपास आठ ते नऊ महिने भटकंती केली पण नोकरी मिळाली नाही. शेवटी गावाकडे परत येऊन माऊलीने शेती करायचा निर्णय घेतला. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचा अभ्यास करून माऊली माने या तरुणांनी एका एकरामध्ये बीन्सची लागवड केली.
advertisement
बीन्स लागवडीच्या अगोदर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती, पण बाजारात टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटोची बाग मोडून काढून त्यामध्ये बीन्सची लागवड केली. एका एकरात बीन्स लागवडीसाठी 2 किलो बियाणे लागले. बीन्सची लागवड केल्यावर नागअळी आणि करपा रोग होऊ नये यासाठी वेळोवेळी फवारणी करून घेतली. लागवड केल्यापासून 50 दिवसांमध्ये बीन्स तोडणीला सुरुवात होते. एकदा तोडणीला सुरुवात झाल्यास जवळपास दोन महिन्यांपर्यंत याची तोडणी सुरू असते.
advertisement
सध्या बीन्सला बाजारभाव 30 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. तर काही व्यापारी जाग्यावरूनच या बीन्सची खरेदी करून घेऊन जातात. एका एकरामध्ये बीन्स लागवडीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलेल्या माऊली माने या तरुणाला जवळपास तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. आतापर्यंत चार तोडे झाले असून बीन्स लागवडीचा खर्च निघाला आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी निराश न होता शेती करावी, जर शेती नसेल तर स्वतःचा व्यवसाय करावा, असा सल्ला पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलेले माऊली माने यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नोकरीच्या शोधात केली भटकंती, शेवटी तरुणानं घेतला शेतीचा निर्णय, आता लाखात कमाई Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement