Weather Alert : महाराष्ट्राला शनिवारी बसणार बर्फासारख्या लाटेचा तडाखा, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
20 डिसेंबर रोजीही राज्यात थंडीचा कडाका असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात थंडी कायम आहे. अनेक जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा घसरलाय. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडी जास्त असल्याचं दिसून येतं आहे. जेऊर येथे 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यातही थंडी कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका कायम आहे. बीड जिल्ह्यांत 10 अंशाच्या खाली तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अहिल्यानगर आणि नाशिक येथे 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
विदर्भातही हुडहुडी कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. अमरावती, गोंदिया, नागपूर येथे 10 अंशाच्या खाली तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानात घट कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.











