advertisement

IND vs SA : हार्दिक पांड्याने फोडून काढलं, 300 च्या स्ट्राईक रेटने धूतलं, तिलकने धु धु धूतलं,आफ्रिकेसमोर किती धावांचे आव्हान?

Last Updated:

अहमदाबादच्या मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने वादळी खेळी केली आहे. हार्दिकने 300च्या स्ट्राईक रेटने फोडून काढत आफ्रिकेला धुतलं आहे.

Hardik pandya tilak varma
Hardik pandya tilak varma
India vs South Africa 5th T20I : अहमदाबादच्या मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने वादळी खेळी केली आहे. हार्दिकने 300च्या स्ट्राईक रेटने फोडून काढत आफ्रिकेला धुतलं आहे. विशेष म्हणजे या खेळी दरम्यान त्याने 16 बॉलमध्येच मोठा रेकॉर्ड केला होता. हार्दिक आणि तिलक वर्माच्या या वादळी अर्धशतकीय खेळीच्या बळावर भारताने 200 पार धावांचा डोंगर नेला आहे.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने भारताची सूरूवात चांगली केली होती. दोघांनी 6 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंची चांगली सूरूवात झाली पण त्यांना मोठ्या धावा करता आल्या नाही. अभिषेक शर्माने 34 तर संजू सॅमसनने 37 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव मैदानात आला पण तो 5 धावांवर स्वस्तात बाद झाला.
advertisement
त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला होता. तिलक वर्माने यावेळी 42 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान 1 षटकार आणि 10 चौकार मारले होते.त्याच्यासोबत हार्दिक पांड्याने 25 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले होते.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 252 होता.शेवटी शिवम दुबेने 3 बॉलमध्ये 10 धावा काढल्या.या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 231 धावा ठोकल्या होत्या.
advertisement
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतके
12 - युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड, डर्बन, 2007 विश्वचषक
16 - हार्दिक पांड्या विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, 2025*
17 - अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
advertisement
18 - केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, 2021
18 - सूर्यकुमार यादव विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गुवाहाटी, 2022
दरम्यान हार्दिक पांड्याने या सामन्यात 16 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. हे अर्धशतक करून त्याने मोठा रेकॉर्ड केला होता.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
advertisement
दक्षिण आफ्रिकेची टीम
क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिन्डे, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओडनिल बार्टमन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : हार्दिक पांड्याने फोडून काढलं, 300 च्या स्ट्राईक रेटने धूतलं, तिलकने धु धु धूतलं,आफ्रिकेसमोर किती धावांचे आव्हान?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement