Bad Odor : घामाच्या वासाचं टेन्शन घेऊ नका, स्वस्त आणि मस्त उपायानं होईल वास गायब, जरुर वाचा

Last Updated:

महागडे डिओडोरंट्स आणि परफ्यूम वापरल्यानंतरही कधीकधी बगलेतला वास पूर्णपणे जात नाही. हा वास केवळ घामाचा नसतो तर बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानं तसा वास येतो. अंडरआर्म्स जास्त ओले असतात, म्हणूनच बॅक्टेरिया वाढतात. याशिवाय, हार्मोनल बदल, जास्त घाम येणं, घट्ट कपडे घालणं आणि अस्वच्छता यामुळेही देखील दुर्गंधी येऊ शकते. यावर एक घरगुती उपाय पटकन करता येण्यासारखा आहे. 

News18
News18
मुंबई : काखेतून घामाचा वास येणं हे नैसर्गिक आहे. अनेकांना आंघोळ केल्यानंतरही काखेतून वास येतो. कुठे बाहेर गेल्यानंतर यामुळे संकोच वाटू शकतो.
महागडे डिओडोरंट्स आणि परफ्यूम वापरल्यानंतरही कधीकधी बगलेतला वास पूर्णपणे जात नाही. हा वास केवळ घामाचा नसतो तर बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानं तसा वास येतो. अंडरआर्म्स जास्त ओले असतात, म्हणूनच बॅक्टेरिया वाढतात. याशिवाय, हार्मोनल बदल, जास्त घाम येणं, घट्ट कपडे घालणं आणि अस्वच्छता यामुळेही देखील दुर्गंधी येऊ शकते. यावर एक घरगुती उपाय पटकन करता येण्यासारखा आहे.
advertisement
बगलेतली दुर्गंधी घालवण्यासाठी, तुरटी वापरू शकता. तुरटी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळते. तुरटी हा स्वस्त आणि मस्त उपाय आहे.
काखेतून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी तुरटीचा वापर करून पाहा. यातले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म घामाच्या वासाचं कारण बनणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.
advertisement
आंघोळ केल्यानंतर, तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि काखेत हळूवारपणे घासा. याला जास्त जोर लावण्याची गरज नाही. नंतर, टिश्यू किंवा स्वच्छ कापडानं तो भाग हळूवारपणे पुसा.
या उपायामुळे, काखेतली दुर्गंधी निघून जाते आणि दिवसभर फ्रेश वाटतं. त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा. कापलेल्या किंवा भाजलेल्या ठिकाणी थेट तुरटी लावू नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bad Odor : घामाच्या वासाचं टेन्शन घेऊ नका, स्वस्त आणि मस्त उपायानं होईल वास गायब, जरुर वाचा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement