Walking : जास्त वेळ उभं राहण्याचे होतात शरीरावर गंभीर परिणाम, या हेल्थ टिप्स नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
जास्त चालणं, जास्त वेळ उभं राहणं आणि सततचा ताण यामुळे शरीराचं हळूहळू नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या सवयींचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
मुंबई : शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे पण तो योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. व्यायामाचा एक भाग म्हणून चालण्याला अनेक जण प्राधान्य देतात. पण चालणं योग्य प्रकारे होतंय का ते पाहणं महत्त्वाचं आहे.
तंदुरुस्तीसाठी काही जण तासनतास चालतात आणि कामामुळे बराच वेळ उभंही राहावं लागतं. जितकं जास्त चालतो तितकं ते फायदेशीर ठरेल असा समज आहे पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. काही वेळा अतिरेकामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.
जास्त चालणं, जास्त वेळ उभं राहणं आणि सततचा ताण यामुळे शरीराचं हळूहळू नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या सवयींचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
जास्त वेळ उभं राहिल्यानं पायांना सूज येणं, पाठ दुखणं आणि नसांवर ताण येणं असे प्रकार होऊ शकतात. यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि थकवा येतो. अनेकांना पायांमधे मुंग्या येणं देखील जाणवतं.
जास्त चालण्याचा परिणाम बहुतेकदा पाय आणि गुडघ्यांवर होतो. जास्त वेळ चालल्यानं गुडघेदुखी, टाचेला सूज आणि पायांच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
advertisement
अनेकांना प्लांटार फॅसिटायटिससारख्या समस्या येतात, ज्यामुळे टाचेखाली तीव्र वेदना होतात. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर सांध्यातील सूजही वाढू शकते.
जास्त चालण्यामुळे शरीराला थकवा जाणवतो. यामुळे पाय जड होणं, कडक होणं आणि कधीकधी कंबरदुखी असा त्रास होऊ शकतो. शरीर सतत जास्त काम करत असल्यानं काहींना झोपेच्या समस्या देखील वाढतात.
advertisement
योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं चालण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज थोडं ते मध्यम चालणं वजन नियंत्रित करण्यासाठी, रक्तदाब संतुलित करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
मधुमेही रुग्णांसाठी नियमित चालणं देखील फायदेशीर मानलं जातं. सततच्या ताणामुळे डोकेदुखी, निद्रानाश, आम्लपित्त आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त ताणामुळे दीर्घकाळात हृदयरोग आणि नैराश्य देखील येऊ शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking : जास्त वेळ उभं राहण्याचे होतात शरीरावर गंभीर परिणाम, या हेल्थ टिप्स नक्की वाचा











