परळीत SBI ग्राहक सेवा केंद्रात चोरी, कुलूप तोडून लाखभर रुपये लंपास, घटना CCTV मध्ये कैद
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शटर तोडताना तीन चोरटे दिसत आहेत.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, परळी (बीड) : बीडच्या परळी शहरातील हनुमान चौक परिसरात एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल १ लाख १४ हजार ३०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शटर तोडताना तीन चोरटे दिसत आहेत.
ग्राहक सेवा केंद्राचे चालक वैभव रोडे यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर ग्राहक सेवा केंद्राचे कामकाज केले. दिवसभरात जमा झालेली १,१४,३०० रुपयांची रक्कम त्यांनी दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे अज्ञात चोरट्यांनी ग्राहक सेवा केंद्रासह शेजारील दुकानांचे शटर तोडले होते.
सकाळी ग्राहक सेवा केंद्राच्या शेजारील दुकानदारांनी वैभव रोडे यांना फोन करून कळवले की, आमचे दुकान फोडले असून तुमचेही दुकान फोडलेले आहे. शटरला कुलूप दिसत नाही. ही माहिती मिळताच वैभव रोडे तातडीने दुकानात दाखल झाले असता, शटरचे कुलूप तुटलेले व दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधील सर्व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
advertisement
परळीतील मध्यवर्ती भागातील दुकानातून चोरी झाल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परळी शहर माणिक नगर परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परळीत SBI ग्राहक सेवा केंद्रात चोरी, कुलूप तोडून लाखभर रुपये लंपास, घटना CCTV मध्ये कैद










