Grey Hair : केस अचानक पांढरे का होतात ? या कारणांचा विचार करा, त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलेले उपाय जरुर वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस अकाली पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. अनुवांशिकता, प्रदूषणासारखे बाह्य घटक, जीवनसत्त्वांची कमतरता, काही वैद्यकीय परिस्थिती यामुळेही केस पांढरे होतात.
मुंबई : वृद्धापकाळात केस पांढरे होतात. पण सध्या लहान वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण खूपच वाढलंय. वीस-पंचवीस वर्षांच्या वयातच केस पांढरे व्हायला सुरुवात होते. त्वचारोगतज्ज्ञ जॉइस पार्क यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी केस अकाली पांढरे होण्यामागची कारणं स्पष्ट केली आहेत.
केस अकाली पांढरे होण्याचं सर्वात मोठं कारण अनुवंशिकता आहे. पालकांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे केस लहान वयात पांढरे झाले असतील तर पुढच्या पिढीतही तसाच अनुभव येऊ शकतो.
सततचा ताण, प्रदूषित वातावरण, धूम्रपान आणि सूर्याच्या तीव्र अतिनील किरणांमुळे शरीरात रॅडिकल्स वाढतात. यामुळे केसांमधले रंगद्रव्य म्हणजेच मेलेनोसाइट्स तयार करणाऱ्या पेशी खराब होऊ लागतात. यामुळे, केस वयाच्या आधी पांढरे होऊ लागतात.
advertisement
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता यामुळेही केस अकाली पांढरे होऊ शकतात.
विशेषतः व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, लोह, तांबं आणि जस्त यांच्या कमतरतेमुळे केसांचं रंगद्रव्य कमकुवत होतं. खराब आहार आणि जंक फूडच्या जास्त सेवनामुळे ही समस्या आणखी वाढते.
वैद्यकीय परिस्थिती - या व्यतिरिक्त, काही वैद्यकीय परिस्थितींमुळेदेखील केस लवकर पांढरे होतात. थायरॉईड, ऑटोइम्युन डिसीज किंवा हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्यांमुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात.
advertisement
बऱ्याचदा लोक या आजारांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढतच जाते. अनुवंशशास्त्र बदलता येत नाही, परंतु जीवनशैलीतल्या बदलांमुळे ही प्रक्रिया मंदावू शकते.
अँटिऑक्सिडंट्स असलेला आहार घ्या. फळं, भाज्या, सुकामेवा खा, ताण कमी करण्यासाठी योगासनं आणि ध्यान करा. धूम्रपानापासून दूर राहा.
advertisement
केस अचानक पांढरे झाले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. याव्यतिरिक्त, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज पडली तर सप्लिमेंटस देखील घेता येतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 8:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Grey Hair : केस अचानक पांढरे का होतात ? या कारणांचा विचार करा, त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलेले उपाय जरुर वाचा











