Breakfast : आतड्यांना हवा तसा नाश्ता करा, चुकीच्या सवयींनी होतं पोटाचं नुकसान, सवयी बदला, चुका टाळा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अनेकदा सकाळच्या खाण्यासंबंधीच्या काही सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या काही सवयी पोटासाठी हानिकारक ठरु शकतात. या सवयींमुळे, पचनक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. अशा चुकांमुळे पोटात जळजळ होणं, आम्लपित्त, पोट फुगणं आणि पोट अस्वस्थ होणं यासारखी लक्षणं उद्भवू शकतात.
मुंबई : दिवसभरात पहिलं अन्न पोटात जातं ते म्हणजे न्याहारी. आपल्या नाश्त्यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. नाश्त्यात काय असतं यावर आपलं शरीर दिवसभर कार्य कसं करेल हे ठरत असतं.
हे झालं साधं गणित पण अनेकजण विविध कारणांमुळे वेळेवर न्याहारी करत नाहीत किंवा करतच नाहीत. याविषयी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी काही माहिती दिली आहे.
अनेकदा सकाळच्या खाण्यासंबंधीच्या काही सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या काही सवयी पोटासाठी हानिकारक ठरु शकतात. या सवयींमुळे, पचनक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. अशा चुकांमुळे पोटात जळजळ होणं, आम्लपित्त, पोट फुगणं आणि पोट अस्वस्थ होणं यासारखी लक्षणं उद्भवू शकतात.
advertisement
नाश्ता वगळल्यानं पोटाला नुकसान होऊ शकतं. नाश्ता वगळता तेव्हा पोट रिकामं राहतं आणि आम्ल तयार होतं, यामुळे पोटाचं नुकसान होवू शकतं.
कॉफी पिणं - सकाळी कॉफी पिणं ही एक सामान्य सवय आहे, पण यामुळे पोटाला हानी होवू शकते. कॉफीतलं आम्ल पोटाला हानी पोहोचवू शकतं.
भरपूर साखर असलेला नाश्ता खाणं - साखरेनं भरपूर नाश्ता खाल्ल्यानं पोटाला नुकसान होऊ शकतं. साखरेमुळे पोटातील आम्ल उत्पादन वाढतं, यामुळे पोटाला नुकसान होवू शकतं.
advertisement
हायड्रेशनचा अभाव - पाण्याच्या अभावामुळे पोटाला हानी होवू शकते. पुरेसं पाणी प्यायलं जात नाही तेव्हा पोट कोरडं होतं आणि आम्ल तयार होतं, यामुळेही पोटाला हानी होवू शकते.
या सवयी बदला -
सकाळच्या या सवयी बदलल्यानं आतड्यांना फायदा होऊ शकतो.
advertisement
नाश्ता करणं, कॉफीपूर्वी पाणी पिणं, साखरयुक्त स्नॅक्स टाळणं आणि हायड्रेटेड राहणं या सर्व गोष्टींमुळे आतडी निरोगी राहतात आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast : आतड्यांना हवा तसा नाश्ता करा, चुकीच्या सवयींनी होतं पोटाचं नुकसान, सवयी बदला, चुका टाळा